Read more
आधी आणि आता
छोटंसं साधं गाव होत नेमकचं थोड्या घराचं
अंगण होत सारवलेलं परस होते बहरलेले
दारामध्ये सुवासिनींनी तोरण होत बांधलेलं
अंगणामध्ये शुभ चिन्ह नेमकचं रेखाटलेलं
सर्विकडे सर्वकाळी उत्सव जणू सजलेला
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद साचलेला
आई वडील ,काका काकु भाऊबंध प्रेमाचे
शेजारपाजार आपले सर्व होते आपुलकीचे
सुखदुःखाचे सोहळे सर्व काही वाटलेलं
दुःख कुणा मनामध्ये कधीच नव्हतं दाटलेला
एकटेपणा कुणालाही कधीच नव्हता खात
औषधाला मित्राची नेहमीच असायची साथ
आपलं आपलं असं कधी कोणीचं नव्हतं राहत
पत्रावळ्या असंख्य निमित्ताने पशुपक्षी पहात
प्रत्येक सणाला उत्सवाला होता एक बाज
मनामध्ये ठरवून आनंदाने साजरा केला जात
कुणाचा कुणाला त्रास जरा सुद्धा नव्हता
मधुमेह हृदयरोग कर्करोग असं काही नव्हते
ताप थंडी पोट दुःखी इतकेच ऐकले होते
साधं राहणं साधं खाणं साधं सरळ वागणं
माणूस पणाचं माणसाशी तेवढं देणं घेणं
विकासाच्या नावाखाली जंगल तोडलं गेलं
आपणचं आपलं तापमान सर्विकडे वाढवलं
प्रगतीचा अर्थ सारा चुकीचा काढला
पैसा पत आणि प्रतिष्ठा दिखावा राहिला
हेवेदावे वरचढ हौसमौस महागडी
घरापुढे हवी प्रत्येकाला मोटारगाडी
मी माझं मला याने दूर नेलं आपल्याला
शांतता संयम प्रेम आणि जिव्हाळा
नुसता आता उरला कधीतरी सांगायला
सचिन खंडू बस्ते (उपशिक्षक)
माध्यमिक आश्रमशाळा इगतपुरी
ता.इगतपुरी जि नाशिक
0 coments