Read more
चांदणभूल
जेष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे साहेब यांची सर्व ग्रंथ संपदा मी वाचलेली आहे.नुकताच प्रकाशित झालेला चांदणभूल हा ललितलेख संग्रह मी वाचला .त्यामध्ये साठच्या दशकात गावामध्ये असलेला निर्मळपणा आणि जपलेली नाती होती.त्याविषयी त्यांनी या संग्रहात लिहीलेले आहे.
या लेख संग्रहातील बरेचसे लेख त्यांच्या बालपणातील आठवणींवर आधारीत आहेत.चांदणभूल या लेखातील आकाशाचे वर्णन अतिशय मनोहारी आहे.आणि आकाशातील कमी होत जाणाऱ्या चांदण्यांमूळे आलेलं हळवेपणही व्यक्त झालेलं आहे.
जूनं ते सोनं या लेखामध्ये सायकलची महती वर्णन केली आहे. लहानपणी हौसेने शिकलेली सायकल आज व्यायाम म्हणून जेव्हा ते चालवतात तेव्हा त्यांना होणारा फायदा व गावकऱ्यांचे कुतुहल याचे मजेशीर वर्णन यात आहे.
तसेच फोटोवाला लेख वाचतांनाही फोटो काढण्याची नवता आणि फ्लँशच्या उजेडामूळे आलेलं भित्रेपण व इतर लोकांच्या हस्तक्षेपामूळे हवी तशी पोज त्यांना देता आली नाही .मग आता तो बालपणीचा फोटो बघतांना त्यांच्या मनात आलेले विचार हयाविषयी त्यांनी फार समर्पक भाष्य केलेलं आहे.
सोनपिवळ्या फुलांची बाभूळ,दिवाळी,रानमेवा,गुपितबाबाचा डोह,या लेखांमध्ये त्या-त्या वयात आपण कसे नादावलो यावर त्यांनी अतिशय छान लिहीलेलं आहे. ग्रामिण जीवनातील काल आणि आजच्या जीवनाविषयी त्यांनी तुलनात्मक चौफेर लिहिलेलं आहे. काही लेखांमध्ये उदा.टेरलीनचा सदरा,गहिवर बैल विकतांनाचा,हे लेख वाचकांना अंतर्मुख करून जातात.
या पुस्तकाचे अरविंद शेलार यांनी चितारलेले मुखपृष्ठही अतिशय सुंदर झालेले आहे.या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तम निरीक्षण शक्ती,क्षणांचे जिवंतपण नेमके पकडण्याची क्षमता आणि उत्सफूर्त विनोदबुद्धी ही ललितलेखनाची वैशिष्ट्ये या संग्रहात प्रभावीपणे मिठे साहेबांच्या लेखणीतुन उतरले आहे. पुस्तकाची मोजक्या शब्दात ,नेटकेपणे ओळख करून देणारी जेष्ठ कवी आणि समीक्षक विवेक उगलमुगले यांची प्रस्तावना हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.विजयकुमार मिठे हे नाव तसं साहित्यविश्वाला परिचित आहेच पण चांदणभूल हे पुस्तक लेखकाला साहित्य विश्वात आपली नवी ओळख मिळवून देईल असा विश्वास वाटतो.
खूप खूप शुभेच्छा !
सौ.मनीषा कुलकर्णी.
-------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
#Team Kadva shivar

0 coments