Read more
प्रशांत भरवीरकर हे माझ्या साहित्य प्रवासातले एक महत्वाचे नाव.त्यांनी आग्रह केला म्हणून चांदणभूलचे ललित लेखन झाले.
माळरानावर जेव्हा आपण जातो तेव्हा तेथे गवत असते, गवतावर फुले असतात, मध्येच एखादे टुणटुणीचे फुल असते, कोठेतरी तरटाचे झाड असते, माठाची भाजी, पोकळा, घोळू अशा सार्या भाज्या, चिखलात कोठेतरी रानावनात चरणार्या गायीच्या खुरांचे ठसे असतात. त्या ठशांमध्ये पाणकवड्या मनसोक्त वलये तयार करीत असतात. एका बाजूला बगळे त्यांचे खाणे शोधण्यात व्यग्र तर म्हशींच्या कळपावर कावळेदेखील उडत असतात. चांदणभूल मध्ये काय नाही याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा हे एक दृश्य माझ्यासमोर येते. चांदणभूल मध्ये हे सर्वच आहे.
--
विजयकुमार मिठे यांच्या नावापुढे ग्रामीण हे बिरूद लागायचे तेव्हा मला नेहमी वाटायचे की या माणसाला साहित्यात संकुचित करून टाकण्यात येत आहे का? पूर्वी आनंद यादवांना ग्रामीण साहित्यिक म्हणत असत तेव्हाही माझी हिच भावना होती परंतु कालांतराने कळत गेले की ग्रामीण बाजात मास्टरकी असणे म्हणजे ग्रामीण साहित्यिक. विजयकुमार मिठे यांचे चांदणभूल वाचताना कळते त्यांना ग्रामीण साहित्यिक का म्हणतात ते. ललितमधून आपले लहानपण मांडणे म्हणजे तसे कसरतीचे काम परंतु विजयकुमार मिठे यांनी ते लिलया पेलले आहे. नुसतेच पेलले नाही तर त्यांचे शब्द मनात घर करतात.
चांदणाभूल संग्रहाच्या आधी मी
त्यांचा "आभाळओल"ललित लेख संग्रह वाचलेला आहे. त्या संग्रहातील "तिच्या अंगणातला पांढरा चाफा" हा लेख आजही माझ्या आठवणीत आहे.त्या लेखातील त्यांची बालपणातली शाळा, मैत्रीण अमिना, तिच्या अंगणातले चाफ्याचे झाड हे सारे लिहिताना मिठेंना कोणत्या शब्दकळांनी घेरले असेल असा अचंबा वाटत राहतो.
चांदणभूल मध्येही मिठेंना
चांदण्यांनी भरलेले आभाळ पाहताना तिकांड, विंचू, सुक दिसतात. या आभाळ आठवणी आजही त्यांनी ताज्या ठेवल्या आहेत याचे अप्रुप वाटते. रात्रभर वावराला पाणी भरताना, बांध घालताना चंद्र त्यांच्या जोडीला असायचा. ते म्हणतात, कधी कधी तो पाण्यात उतरून माझ्या पायात घुटमळायचा. किती सार्थ अनुभव आहे हा. चांदण्यांनी भरलेल्या आभाळावर मिठे यांचे भारी प्रेम. या आभाळातून तारा तुटून पडला की त्यांना जास्त दु:ख व्हायचे. त्याच्या भोवतीचे बालविश्व त्यांनी अतिशय सुंदरपणे साकारले आहे. तुटता तारा पाहू नाही, ते पाहणे अशूभ असते ही त्यांच्या मनावर लहानपणी बिंबवली गेलेली गोष्ट आजही त्यांच्या तितकीच लक्षात आहे. त्यांची ही आठवण आजच्या एखाद्या लहानपणाशी तार जोडणारी आहे. आजही तारा तुटताना दिसला की मुले देवाकडे काहीतरी इच्छा सांगतात, गॉड ब्लेस यू म्हणतात. ते यातूनच आले आहे. चांदणभूल म्हणजे एखाद्या गोष्टीची भूरळ पडणे, लेखकाला आता आभाळ चांदण्याविना रिते झालेले आढळते
मळई नावाच्या त्यांच्या वावरात "सोनपिवळ्या फुलांची बाभूळ" आहे, या बाभळीचे वर्णन वाचताना आपल्याला आपल्या बालपणात जायला होते. ग्रामीण भागात ज्यांचे बालपण गेले आहे, त्यांच्यासाठी ही बाभूळ म्हणजे खूप काही असते. कधी
बाभळीच्या झाडाला झोके बाांधलेले असतात तर कधी बाभळीच्या खुळखुळ वाजणार्या शेंगांच्या गळयात माळा होतात.पिवळ्या फुलांची कानात कर्णफुले होतात. ही बाभूळ मिठे यांच्याही वाटयाला आली, तिने त्यांचे आयुष्य समृध्द करून टाकले आहे.
"गोष्टी रंगल्या ओठी" हेदेखील अतिशय जमून आलेले ललित आहे. गुलतुर्याभोवती फिरणार्या आठवणी सुंदर आहेत. कांगुण्या खाताना रंगणारे ओठ, गुलतुरे खाऊन एकमेकांच्या अंगावर पिचकार्या मारणे हे सारे वर्णन आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जाते. दिवाळी, टेरिलिनचा सदरा, गुपितबाबाचा डोह, जुने ते सोने, गहिवर बैल विकतानाचा, पावसाचं काही देणं लागतो" हे लेखही अतिशय भावूक होऊन लिहिलेले आहेत. रानमेवा, बिनपैश्यांचा आनंद, फोटोवाला या लेखांमध्ये एकप्रकारची सर्जनता आहे. चांदणभूलमधील लेख वाचत असताना आपल्यापुढे ते चित्र साकारत जाते. जसा रेडिओ ऐकताना आपण त्या गोष्टीचे चित्र मनाशी साकारू लागतो तसे चांदणूभलचे आहे.
मिठे यांची शब्दकळा जातीवंत आहे. ग्रामीण बाजातले शब्द मनाला मोहवणारे आहेत. मला तर वाटते चांदणभूल या ललितसंग्रहातील ग्रामीण शब्द बाजूला काढले तर त्याचा एक संग्रह तयार होईल. लक्ष्मण माने यांना त्यांच्या ‘उपरा’च्या वेळी जशी शब्दांची सूची जोडावी लागली होती तशीच मिठे यांच्या शब्दांची एक जंत्री होऊ शकते. मराठी साहित्याला हा अनमोल ठेवा आहे. त्यांच्या आणखी येणार्या पुस्तकांमध्ये त्यांनी हा प्रयोग जरूर करावा असे वाटते.
संग्रहातील रेखाटने हा स्वतंत्र विचार करण्याचा विषय आहे. अतिशय सुंदर रेखाटने कृष्णकुमार सोनवणे यांनी काढली आहेत. गोष्टीचा गाभा समजून घेऊन ही चित्रे काढल्याने त्यात नेमकेपणा आला आहे. संग्रहाची प्रस्तावना हादेखील स्वतंत्र बोलण्याचा विषय आहे, अतिशय वैचारिक प्रस्तावना विवेक उगलमुगले यांनी लिहिली आहे. संपूर्ण पुस्तकाचा गोषवारा त्यात आला आहे. मनातले लिहिताना मिठे यांनी हातचे काहीही राखून न ठेवता सारे उधळून दिले आहे.
कोपरीवरला आपला अगदी जुने खोड असलेला आज्जा बोलताना ज्या भाषेचा वापर करतो ती भाषा चांदणभूलमधून येते. वरल्या अंगाला, खाल्या अंगाला हे शब्द आता फारसे कानावर पडत नाही त्यामुळे भाषेचा हा गोडवा नाहीसा होतो की काय असे वाटत असतानाच चांदणभूल हे पुस्तक आले आणि मनात विचारांची गर्दी झाली. अरेच्चा हे तर आपले बालपण! आपल्या लहानपणी आपण असेच तर होतो आपल्याही चौकडीमध्ये एक गणप्या होता, त्याला आपणही टाळत असायचो. मिठेंचा गुपीतबाबाचा डोह होता तसा आपल्या दहाव्या मैलावर म्हसोबाचा डोह होता, मिठेंची सोनपिवळ्या फुलांची बाभूळ होती तशी आपणही शेळी बोकड्याच्या डोंगरावर लहानपणी पाहिली आहे. आपणही लहानपणी गुरं चारायला जायचो तेव्हा झिऱ्याचे गोड पाणी पिलो आहे मग ते गेले कुठे? मिठेंनी जसे इतक्या वर्षानंतर आठवणींचा पेटारा खोलला तसे आपण का नाही करू शकत असेही वाटून गेले. मला वाटते वाचकाला असे वाटणे हेच या चांदणभूल ललित लेखसंग्रहाचे यश आहे.चित्रकार अरविंद शेलार यांनी काढलेले मुखपृष्ठ अतिशय समर्पक आहे.
--प्रशांत भरवीरकर
नाशिक
---------------------------------------------------------------- ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
#Team Kadva shivar

0 coments