Read more
||चांदणभूल: गावहृदयाच्या स्पंदनांचा साक्षात्कार||
विजयकमार मिठे या नावास मी चोवीस-पंचवीस वर्षांपासून ओळखतो. शेतीचं साहित्य हाताळता हाताळता साहित्याच्या नादी लागलेलं एक शेतकरी नाव आहे. हाडाचा शेतकरी आहे हा माणूस; अन शेतकऱ्याच्याच भावभावनांचा पेच आपल्या साहित्यातून मांडून, वावरात बियाण पेरता पेरताच वहीवरही साहित्याचं पीक निगुतीने घेत आलेलं हे नाव आहे. शेतकरी म्हणून जगताना त्याने औत-फाटा उसना घेतला असेल मात्र साहित्याचं पीक घेताना ताने कवडीचीही उसनवार केलेली नाही. शेतीशी अन साहित्याशी लडबडून गेलेल्या या माणसाने ‘मी शेती करुन शेतकरी साहित्य लिहितो!’ असं मार्केटिंग आजपावेतो केले नाही. अन पुढेही करणार नाही ही पक्की खात्रीच आहे मला.
शेती करता करता साहित्य नावाची आतबट्टयाची गोष्ट करत राहणं; ही काही सोपी गोष्ट नाहीच. तरीही पदरमोड करुन साहित्य आणि साहित्यातील माणसांना मनस्वी जपत राहिलेला कृषिनिष्ठ साहित्यिक! साहित्याने किती मानमतराब जोडले की नाही! नसेल तर नैराश्याने घेरलं नाही. एखादं व्रत घ्यावं तसा व्रतस्थ झाला हा माणूस. स्वत:चं प्रकाशन काढलं. वाड्मयीन ‘कादवा शिवार’ नावाचं मासिक काढून ते नियमित चालवलं. त्यासाठी कुणापुढे पदर पसरवला नाही. आपलं साहित्याचं काम नेकीनं करत राहिला. शेतीची जीवतोड मशागत करण्याची धम्मक तशीही रक्तात मुरलेली होतीच. तेच सूत्र त्यास साहित्यात उपयोगी पडलं असावं म्हणूनच की काय, ‘घोंगट्या कोर’, ‘काद्वेचा राणा’, ‘बुजगावणं’, ‘हेळसांड’, इत्यादी कथासंग्रह, ‘गावाकडची माणसं’, ‘माझी माणसं’ हे व्यक्तिचित्र संग्रह, ‘हिर्वी बोली’, हा काव्यसंग्रह आणि ‘आभाळाची ओल’ हा ललित लेख संग्रह अशी दमदार वाटचाल करत ‘चांदणभूल’ या ललितलेख संग्रहापर्यंत पोचलेलं हे नाव!
‘चांदणभूल’ नुकताच वाचून हातावेगळा केला; असे जरी मी म्हटलो तरी स्वत:तून त्यास बाजूला करणे केवळ अशक्य! गावाचं ‘हृद्य’च ‘चांदणभूल’मधून विजयकुमार मिठे यांनी समोर ठेवलं आहे. त्याचे ठोके अतिशय स्पष्ट ऐकू येतात स्टेथोस्कोपने मापण्याची जराही आवश्यकता भासत नाही. ज्याने ग्रामसंस्कृतीत श्वास घेतला आहे; त्यास तर ही स्पंदने अगदी तीव्रतेने जाणवतील. पुन्हा एकदा गाव ‘जगून’ झाल्याचा मनस्वी आनंद त्याच्या चित्तवृत्तीवर पसरुन राहील. तेरा ललित लेखांचा हा गुच्छ सर्वार्थाने उत्कृष्ट उरतला आहे. एक माप इकडे न तिकडे तंतोतंत, असा एकेक ललित लेख आहे. आजपर्यंतच्या मेहनतीचं सगळ्यात जास्त धान्याचा ‘झडवा’ असलेलं हे चांदणभूलचं पीक आहे.
अस्मानी-सुलतानी या कुठल्याही संकटाची तमा न बाळगता आता हा माणूस जी पेर करेल ती सकसच उगवून येईन याची ग्वाही चांदणभूल देते. ललित लेखाचं शीर्षक झालेला ‘चांदणभूल’ हा लेख आणखी ‘सोनपिवळ्या फुलांची बाभूळ’, गोष्टी रंगल्या ओठी’ हे तिन्ही ललित लेख मला विशेष भावले. याचा अर्थ असा नाही की उरलेल्या लेखांत काही उणीव आहे. एकाच विषयावर लिहितांना ही भीती असते की तोचतोचपणा येण्याचा दोष निर्माण होण्याची दाट शक्यता असते पण विजयकुमार मिठे यांच्यातील लेखकाचं कसब हेच आहे की त्यांनी तसं होऊ दिलेलं नाही.
आपल्या गावाबद्दल आणि गावच्या प्रत्येक माणसाबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकाला हे लेख वाचून ‘चांदणभूल’ निश्चितच पडेल; पण मला खात्री आहे की त्यातील अनुभवांच्या सच्चेपणामुळे, आपण त्यात हरखून गेल्याशिवाय राहणार नाही. साठ सालानंतरच्या समाजजीवनाचा आलेख, चिंतनशीलतेने मांडणाऱ्या या ललितलेख संग्रहाचं सुजाण वाचक मोठं स्वागत करतील. असा विश्वास व्यक्त करणारे प्रसिद्ध कवी विवेक उगलमुगले यांचं हे म्हणणं मला खूप महत्वाचं वाटतं.
उत्कृष्ट भाषेचा नमूना म्हणून मी ‘सोनपिवळ्या फुलांची बाभूळ’ या ललित लेखाकडे पहातो. मी आजवर जे ललित लेख वाचत आलो आहे. त्यात माझा अतिशय आवडीचा हा ललित लेख आहे. त्याची भाषा अतिशय काव्यत्म आहे, हे तर कारण आहेच; मात्र विलक्षण ओघवती. धरुन ठेवणारी. खूप काही पदरात टाकणारी. त्याची सुरूवात तुमच्या समोर ठेवतो; ‘माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या मळई नावाच्या पाच बिघ्याच्या शेताच्या मधोमध एक भलंमोठं फांद्याफांद्यांनी विस्तारलेलं हिरवंगार बाभळीचं झाड होतं. एखाद्या हिरवीचोळी पातळ नेसलेल्या पोक्त बाईनं काळ्याभोर वावराच्या मधोमध फथकल मारून बसावं तसं ते दिसायचं..’ लेखकातल्या लेखकाने मला या सोनपिवळ्या बाभळीशी बांधून घातलं आहे.
‘चांदणभूल’ या ललितलेखाची वीण अशीच आहे की जिथे लेखकाचे कौतुक केल्यावाचून राहवत नाही. ललित लेखातून वास्तवाला धरुन बऱ्याचदा कल्पनेचा उथळ खेळ खेळला जातो. मात्र विजयकुमार मिठे यांनी त्यांच्यातील बालसुलभ निरागसतेला वास्तवाची जोड देऊन चांदण्याच्या प्रदेशातील ‘तीकांड, बाज, विंचू, सूक, याची बेमालूम उकल केली त्यास तोड नाही.
‘चांदणभूल’च्या भाषेवर स्वंतत्र अभ्यास व्हावा, अशी समृद्ध ती उतरली आहे. एखाद्या दुसऱ्या ओळीत मांडून तिच्यावर अन्याय होईल. लेखकाला वेगळं ठरवते ती केवळ त्याची ‘भाषा’. विजयकुमार मिठे यांचे यश हेच आहे की त्यांनी त्यांची भाषा कमावली आहे. याच भाषेने ‘चांदणभूल’ला वेगळं ठरवलं आहे. मराठी साहित्याने नोंद घ्यावी. एवढी क्षमता चांदणभूलने समोर ठेवली आहे.
अक्षरवाड्मय प्रकाशनच्या बाळासाहेब घोंगडे यांनी खूप चांगली मेहनत घेऊन हे पुस्तक समोर ठेवले आहे. चित्रकार अरविंद शेलार यांचे मुखपृष्ठ आणि कृष्णकुमार सोनवणे यांनी केली रेखाटणे पुस्तकाच्या देखणेपणात वाढ करण्यात यशस्वी ठरतात. दीपक दंडवते या कल्पक माणसाने केलेल्या सजावटीचंही कौतुक व्हायलाच हवं.
🖋 ऐश्वर्य पाटेकर
(नाशिक)
आपण ‘चांदणभूल’ वाचावं म्हणून हे समोर ठेवतो आहे
चांदणभूल- ललितलेख संग्रह
लेखक- विजयकुमार मिठे
प्रकाशक- बाळासाहेब घोंगडे
संपर्क: ९८३४०३२०१५
-------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
#Team Kadva shivar

0 coments