Read more
सूड
नका बघू अंत आमचा
करू सरळ मार्ग तुमचा
वाट आमच्या भविष्याची
नका रोखू तारुण्याची
काळ आमचा उमेदीचा
प्रश्न आमच्या परीक्षेचा
लढतो आम्ही संघर्षाने
वागा तुम्ही नितीधर्माने
नका खाऊ फुकट दाणे
सोडा तुमची लाज आता
मारू नका फुकट बाता
एक जरी सडला कांदा
करून सोडतो सर्व वांदा
वेळीच त्याला फेकला नाही
सर्वच माल खराब होई
उपाय आता जहरी करा
कीड सर्व बाजूला सारा
व्यवस्तेने खून केले
भविष्याचे बळी गेले
शिक्षा त्यांना जबर करा
गोळी घालून ठार करा
भावना आहे सुडाची
भाषा आमची ठोकायची
वेळीच आता सुदरून जा
जळत्या ज्वाला तश्याच पहा
सचिन खंडू बस्ते (उपशिक्षक)
माध्यमिक आश्रमशाळा इगतपुरी
तालुका इगतपुरी जि नाशिक


0 coments