भ्रष्टाचारी' कविता (कवी: सचिन खंडू बस्ते)

भ्रष्टाचारी' कविता (कवी: सचिन खंडू बस्ते)

Author:
Price:

Read more


 भ्रष्टाचारी

संपत्तीच्या जोरावर 

भीती सर्व संपली

आता काय घेऊ 

पसंती तेवढी उरली


काम नको आता

आराम करू जरा

बुद्धी फिरली 

लालसा लागली


दिसू लागले दिवसा चांदणे

रंगू लागले दिवा स्वप्ने


विना कष्ट फुकट धष्ट

विकत घेऊ उडवून लाऊ


हक्क मारू कुण्या गरीबाचा

झाकली मूठ सव्वा लाखाची

तू चूप मी चूप भेट ती नोटांची


माणसाशी काय घेणं 

स्वार्थाचं ते पाहणं


घर भरतील लाचार होतील

शेपूट हालवत पळत सुटतील


मालक मीच चालक मीच

काठी माझी म्हैस माझीचं


कोण आपलं वाकड करणार

ओळख आपली साहेबाची

भीती कसली परिणामांची

सापडलो तर मिटवून घेऊ

यंत्रणा सारी  दुर्जनांची


आचार गेले विचार गेले 

भ्रष्टाचारी तेवढे उरले.....


सचिन खंडू बस्ते (उपशिक्षक)

माध्यमिक आश्रम शाळा इगतपुरी

तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक

0 coments