तरुणांमध्ये नवा जोश, जिद्द आणि विज्ञानाचा संदेश देणारी प्रेरणादायी कविता: 'तरुण' — कवी सचिन खंडू बस्ते

तरुणांमध्ये नवा जोश, जिद्द आणि विज्ञानाचा संदेश देणारी प्रेरणादायी कविता: 'तरुण' — कवी सचिन खंडू बस्ते

Author:
Price:

Read more



 तरुण

जळजळीत वास्तव खुपलं नाही .

उपयोग काय तारुण्याचा ,

काळ असाच लोटत जाणार 

तुझी संधी हुकत राहणार


वाट कसली बघतो मूर्खां 

विचार कर भविष्याचा

चोर वाटा अनेक झाल्या 

विस्फोट कर सत्याचा


आधार घे तंत्राचा

मंत्र जाण विज्ञानाचा



लोकशाहीचा राजा तू 

सत्ता तुझ्या मस्तकी ठेव

आज तुझा श्वास दाबला

रोखून धर दम एवढा 

मत पेटीतून मोकळा कर


इतिहासातून शिकला काय

गुलामगिरीला लगाम दे

माथेफिरूनच्या मान्सुब्याना 

सुरुंग लावून पेटून दे


मस्तक तुझं शांत करण्या 

पुस्तक आता जवळ घे 

बोथट झाल्या भावना तुझ्या 

औषध म्हणून घोळून पे


थेंब काही समुद्र नाही 

निराशावादी होऊ नको

आशावादाचा पाऊस सारा

थोडा थोडा पाडून घे 

नदी नाले वाहतील त्याने

त्याची चिंता करू नको

जग खुप मोठं आहे

डबके होऊन सडू नको


एक काडी जाळली म्हणून 

वनवा काही पेटत नाही

जोर धरून हवा आली तर

जंगल काही सोडत नाही


सचिन खंडू बस्ते (उपशिक्षक)

माध्यमिक आश्रम शाळा इगतपुरी

तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक

0 coments