बालक नवक्रांतीचे' - प्रगती आणि देशप्रेमाचा संदेश देणारी खास कविता, कवी सचिन खंडू बस्ते

बालक नवक्रांतीचे' - प्रगती आणि देशप्रेमाचा संदेश देणारी खास कविता, कवी सचिन खंडू बस्ते

Author:
Price:

Read more




बालक नवक्रांतीचे

​अभिमानाची शिखरे ओलांडू

लावू दिवे प्रगतीचे,


​पर्वत सर करू काठिण्याचे

मनशक्ती भक्कम आमची

आम्ही बालक नवक्रांतीचे


​घेऊ भरारी गरुडाची

चोच आमची धारेची

वेदना आम्हा न शिवे

अनुभव असे खरा गुरु


​सापडतील कैक हिरे

साखळी असे एकोप्याची

जैसी मुंगी वारुळाची


​ज्योत हृदयी पेटत राहते

सळसळणाऱ्या रक्ताची


​मेंदूमधले भेद सारे

चिरडून काढू या कारणे


​देशहित आमचे सर्वोपरी

तिथे ना कसली सल उरे


​सचिन खंडू बस्ते (उपादेशक)

माध्यमिक आश्रमशाळा इगतपुरी

तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक.

0 coments