आई कविता, सचिन खंडू बस्ते यांची भावपूर्ण रचना

आई कविता, सचिन खंडू बस्ते यांची भावपूर्ण रचना

Author:
Price:

Read more

                                      

आई

मिठीत तुझ्या गं लेकरू

आई स्थिर राहिले,

दाविले सुख जन्माचे

आनंदे तु स्पर्शिले.


स्वर्ग जरी मिळाला

पद जरी उच्च आले

शिरी मुकुट राजाचा

नाद जरी गरजला

जयघोष तो दुमदुमला

तरी आठवेल मला

राज्यभिषेक खरा

बाळा सोनुला हासला.


दुःख जरी पहाडी, हादरे मायेस मोठे

ठेच लागता पायी, तिचे मंत्र स्फुरले

दुःख जरी क्षणाचे असंख्य वेदना क्षमल्या

वैद्याने जे केले, आई स्मरण करून झाले.


भगवंत एक जीवंत

घडतील मुर्त्या असंख्य

मिळेल प्रेम क्षणात, भव्य हृदय खोल

साठा तेथे रत्नांचा आई तुझ्या प्रेमाचा.


सचिन खंडू बस्ते

माध्यमिक आश्रमशाळा इगतपुरी

ता. इगतपुरी जि. नाशिक.


0 coments