Read more
शेतीमाती मध्ये
पाहू नका स्वप्नं
येती सदा विघ्न
निसर्गाचे/1
कधी गारपीट
वारा वावटळ
मध्येच दुष्काळ
ठरलेला/2
झाला जडशीळ
संसाराचा भार
कर्जाचे डोंगर
वाढतात/3
जे जे पिकवले
मातीमोल गेले
काही न उरले
शेवटाला/4
आता व्हा रे जागे
करा जोडधंदे
लाभाचे फायदे
उठवा रे /5
पाळा गाईगुरे
विका दुध लोणी
करा साठवणी
संपत्तीची/6
करावी नोकरी
कारखानदारी
बनावे व्यापारी
कुणब्यानं/7
--विजयकुमार मिठे.
मो.9881670204 छायाचित्र- प्रतीक विजयकुमार मिठे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
...सावधान...
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संपादक - कादवा शिवार
#Team Kadva shivar




0 coments