Read more
पाण्याचा हा धर्म
जीवनाचे कर्म
समाजाचे मर्म
पाणीच हे /1
पाण्याविन नसे
कुणाचे जगणे
जीवनाचे गाणे
गाते पाणी /२
कधी अवकाळी
पडतो पाऊस
घालतो हैदोस
शिवारात /3
पाणीच जीवन
पाणीच मरण
भरण पोषण
करी पाणी /४
-संजय निरगुडे
मो.9422769635
------------------------------------------------------------------- ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो-9145099071
#Team Kadva shivar

0 coments