गझल - शक्य नाही वाटते.. तेही घडू शकते  शक्यता आहे मला मी सापडू शकते - deepali Kulkarni

गझल - शक्य नाही वाटते.. तेही घडू शकते शक्यता आहे मला मी सापडू शकते - deepali Kulkarni

Author:
Price:

Read more

शक्य नाही वाटते.. तेही घडू शकते

शक्यता आहे मला मी सापडू शकते


वाटले अवघड जरी होते कधीकाळी

आज कोडे ते अचानक उलगडू शकते


चारचौघीसारखी नव्हते कधीही मी

मान्य कर ना मी तुलाही आवडू शकते


ऐकणारा एकही माणूस नाही पण

एक म्हातारी तरीही बडबडू शकते


झेप हिमतीने नवी घेताच कळले की

मुक्त आकाशात कोणीही उडू शकते


सौ. दीपाली कुलकर्णी

देगलूर जि.नांदेड

7798283421

0 coments