Read more
नको नको रे पावसा
पडू असा तू अवेळी
जेव्हा असे गरज आम्हा
बरसत जा तू त्याचवेळी ....।।१।।
नको नको रे पावसा
आमचा अंत असा पाहू
उद्या पासून तू आता
चालता हो बघ पाहू .........।।२।।
नको नको रे पावसा
बंद कर आता तुझं पाणी
आलेलं पीक आता आमच्या
येऊ दे हाती गोडवाणी .....।।३।।
नको नको रे पावसा
आता जा ना तू माघारी
हवं तर पुढच्या वर्षी
जरा ये तू लवकरी ...........।।४।।
नको नको रे पावसा
असा कोसळू तू घरांवरी
गेले आमचे घर त्यात
मातीचे रे वाहवूनी ...........।।५।।
नको नको रे पावसा
नको सोडू तुझा तू संयम
तुझ्या येण्याची रे आस
आम्हा असू दे कायम ......।।६।।
नको नको रे पावसा
करू नासधूस पिकाची
जगणं मरणं आमचं सारं
आहे त्याच पिकावरी........।।७।।
नको नको रे पावसा
पडू असा तू दिवसा
काम धंदा मिळत नाही
मग रडू येते ढसा ढसा......।।८।।
नको नको रे पावसा
असा नको रे तू पडू
गेली कित्येक जनावरं
नदी नाल्यात वाहवून......।।९।।
✍️ अण्णासाहेब बडाख
99 23 93 53 81
------24120720222150------
★★◆◆ ●समाप्त● ◆◆★★

0 coments