कादवा प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार २०२३ जाहीर

कादवा प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार २०२३ जाहीर

Author:
Price:

Read more

 *कादवा प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर*




पालखेड बंधारा (नाशिक)येथील 'कादवा प्रतिष्ठान'च्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कार विजेत्यांची नावे कादवा प्रतिष्ठानचे सरचिटणीस विठ्ठलराव संधान यांनी जाहीर केली आहेत.

     स्व.इंदुबाई आणि त्र्यंबकराव गणपतराव संधान स्मृती मायबाप काव्य पुरस्कार अशोक लोटणकर यांच्या "अक्षरनामा" या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये ११,०००/- स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे.


      कादंबरीसाठी देण्यात येणारा स्व.चंद्रकांत महामिने उत्कृष्ट वाड्.मय निर्मिती पुरस्कार नागू वीरकर यांच्या "हेडाम" कादंबरीस जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये ५,१००/-सन्मानचिन्ह, मानपत्र असे आहे.


     कथासंग्रहासाठी देण्यात येणारा स्व.मुरलीधर राघो चौधरी कथा पुरस्कार काशीनाथ माटल यांच्या "खेळ मांडियेला नवा"

कथासंग्रहास जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये ३,१००/- सन्मानचिन्ह, मानपत्र असे आहे.


     चांदणभूल उत्कृष्ट ललितलेखन पुरस्कार सचिन पाटील यांच्या "पाय आणि वाटा" ललितलेख संग्रहास जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये २,१००/- सन्मानचिन्ह, मानपत्र असे आहे.


     कादंबरीसाठी देण्यात येणारा साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे उत्कृष्ट वाड्.मय निर्मिती पुरस्कार अशोक कुबडे यांच्या "गोंडर" कादंबरीस जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये २,१००/- सन्मानचिन्ह, मानपत्र असे आहे.


     स्व.बाबुराव रामजी मिठे स्मृती बालसाहित्य पुरस्कार संयुक्ता कुलकर्णी यांच्या "धडाकेबाज" या संग्रहास जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये २,१००/- सन्मानचिन्ह, मानपत्र असे आहे.

     पुरस्कार वितरणाची तारीख विजेत्यांना लवकरच कळविण्यात येईल.


0 coments