Read more
"सय सजनीची येता''
सय सजनीची येता
जीव कावरा बावरा
तिच्या सहवासामधी
चाफा फुलतो मोगरा.....
गोरीमोरी माझी सखी
माझी सुषमा सुंदरी
माझ्यासाठी दाही दिशा
तिच्या पायाला भिंगरी....
नाही घेत आढेवेढे
तिचा हासरा मुखडा
संसाराचा गाडा ओढी
माझा काळीज तुकडा....
आम्ही दोघं राघूमैना
दूर ढोलीत राहतो
सोबतिला चिलेपिले
दाणे चोचीत घालतो......
पदराने पालविते
सखी आम्हा दिनरात
माझ्या कर्तृत्वाचे नारे
रोज तिच्याच ओठात........
गोड हसून बोलणं
थोडं लाजरं वागणं
दुजियांच्या कामी येणं
माझ्या जीवनाचं सोनं.........
कुर्वाळून अंग तिला
जेव्हा मिठीमध्ये घेतो
तिचे माझे श्वास दोन
सुर मात्र एक होतो......
लोखंडाचे बाहू माझे
तिचा देह परिसाचा
आलिंगन देता घेता
जन्म होतो सोनियाचा....
----भास्कर विठोबा देशमाने.
मोबा.न.-- ९६५७५५५१९०.

0 coments