Read more
आई बापाचं हस्ताक्षर
मला नवी कोरी पाटी घेतली तेव्हा
वडिलांनी गिरवून दिले शब्द नवे
तेव्हा डोळ्यातून त्यांच्या पाझरत गेलं तेच
बापाच्या काळजाचं हस्ताक्षर..
टाका टाका घालत बसायची आई
दिवसा गोधडी शिवताना
तो एक एक टाका म्हणजेच
आईच्या वेदनेचं हस्ताक्षर.....
किती पानं फाडून टाकली
किती पेन बदलून पाहिले
किती शब्द वापरून पाहिले
पण
बापाच्या काळजासारखं अन्
आईच्या वेदने सारखं
हस्ताक्षर गिरवताच आलं नाही कधी .....
संदीप एम भांबेरे
---------------------------------------------------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
---------------------------------------------------------------------------------------------------------------

0 coments