Read more
पाय मातीचेच बाई
घट्ट मातीत रूतले
अभिषेकाने घामाच्या
माय मातीला पुजले
माती जगवते बाई
माती सजवते जीणं
माती पदरात देते
सुख सपनाचे दान
पाय असावे मातीचे
आणि मन आभाळाचे
अर्थ येतो आयुष्याला
होते सार्थक जीण्याचे ..!
संदीप काळे,पाडळी
---------------------------------------------------------------------------------
..सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
Kadva shivar


0 coments