Read more
नाही ठाऊक कोणास
नाही ठाऊक कोणास
किती लाभलेत श्वास
किती दिसांचा असेल
तुझा माझा सहवास
नियतीच्या तालावर
चाले आयुष्याची नौका
किती हिंदोळले तरी
नाही होणार सुटका
येतो दिवस तसाच
रात्र येते पाठीमागे
चक्र अविरत असे
चालू रहाटगाडगे
क्षण क्षण येतो जातो
फिरे काळाची नागीण
सुख दुःख देता घेता
टाकी आयुष्य वेढून
योगिता राजकर,वाई
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071

0 coments