Read more
मन रेशीम रेशीम
मन रेशीम रेशीम
अंकुरता भुईकोंभ
नाही सोसत तयाला
काहिलीचा आगडोंब
कडू गोड क्षण किती
भरलेले ओंजळीत
घाव काळजाचे ताजे
उफाळती स्मरणात
किती ठेवावे झाकून
सल उमलून येती
किती उगाच चालती
जीवघेण्या कसरती
नाही काळाचा भरोसा
कसा ठाकेल पुढयात
दिला जीव सांधवून
तुझ्या आठव झुल्यात
योगिता राजकर
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071

0 coments