Read more
जरी मोडलं सपान
जरी मोडलं सपान ,
पुन्हा पेरायला नवं ....
बीज रुजण्याला आधी ,
शेत नांगराया हवं ....
एका चाकाची नांगरी ,
तिला तीनतोंडी कडी ....
चाले मातीच्या पोटात ,
पडे धडीवर धडी ....
जोडी खिलार जाडीला ,
जिला साखळीचे चाळ ....
नव्या तासात जाताना ,
कुस बदलतो फाळ ....
मुस्के फेसाळले तरी ,
त्याला दोहण्याचा धाक ....
भार पायाचा पडता ,
कुई कुई करी चाक ....
नको न्याट वढताना ,
बंधू प्रेमाच्या नात्यानं ....
जरा हलकी धरीतो ,
'बळी' नांगरी हातानं ....
तण ऊरात माजलं ,
झालं हरळीचं झाड ....
बिलाईत नी लोहळी ,
जाई ढेकळाच्या आड ....
सारी हयात घातली ,
माझ्या माणूस पणाला ....
आता काही आडतासं ,
माझ्या पडीक मनाला ....
नाही वाहत्या घामाला ,
शिण थकवा शिवत ....
चाले पारग पारग ,
जिंदगाणीचा "हिवत"....
कवी - सोमनाथ कारभारी एखंडे
मु.पो. टाहाकारी , ता.अकोले
जि. अ.नगर , मो.नं. 9421827332 .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
Kadva shivar
कादवा शिवार


0 coments