Read more
श्रावण आला...
रेशिमधारा घेऊन हसत नाचत श्रावण आला
बहरुन आली राने सारी गंध मातिचा ओला
इंद्रधनूची कमान सजली नभी घनांची दाटी
स्वागत करण्या तरुवर नटले सज्ज लतेची ताटी
डोंगरमाळा जलात न्हाल्या धरणी अवघी सजली
शालू हिरवा नेसुनी जशी नववधु लाजरि नटली
डवरुन आली जाईजूई चाफा मजेत डुलतो
रानफुलांचे बेट पाचुचे मनी केवडा फुलतो
दाहीदिशांत उधळीत रंग सोनपाऊले येतो
तांबुस कोवळे ऊन्ह पसरे वारा गाणी गातो
मेघांमधुनी अमृत शिंपित नदी ओढ्यात शिरतो
दरी खोऱ्यात झरझर झरतो नाद मंजूळ घुमतो
रमतगमत वा कधि रुबाबात राजहंस हा भासे
दाट धुक्याचि चादर ओढुनि रानोमाळी ठासे
लाजत मुरडत कुणी नववधू झिम्मा फुगडी खेळे
पदर सावरुन चिंब सरींशी करते नटखट चाळे
हरीकथांचा जागर होई मनी अर्चना पूजा
आनंदाला उधाण येते श्रावण उत्सव राजा
रेशिमधारा घेऊन हसत नाचत श्रावण आला
बहरुन आली राने सारी गंध मातिचा ओला
*श्री शिवदास दादाजी निकम*
*मो.--- ९४०३४९२२९१*
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
Kadva shivar


0 coments