Read more
भीती साऱ्या सृष्टीत
शिंक येताच बदलते
भोवतालची दृष्टी
कोरोना पेक्षा वाटते
भयाने मरतील सारे
सर्दी खोकला होताच
संशयाचे वाहती वारे
कधी शहरी आप्तांची
पाहीली जात होती वाट
आता ते न येण्यासाठी
मनाचे होताय घाट
शहरांचा तर होता
लखलखाटी थाट
आता मात्र खेड्यांची
धरली सर्वानी वाट
कोरोना च्या साथीने
दिशाभूल सारे झाले
माणसातले माणूस
आजच मात्र कळाले
कोरोनाच्या राज्यातही
शेतकरी गरीब राहीला
अन् मास्क च्या कंपन्या
करोडपती झाल्या...
क. प्रतिभा खैरनार

0 coments