Read more
*ईश्वरा प्रार्थना*
ईश्वरा प्रार्थना । करी एक तुला ।
सोडव जगाला । विघ्नातून ।। धृ ।।
कसले ग्रहण । कसला आजार ।
नसे उपचार । कोणाकडे ।। ०१ ।।
सहज पसरे । आबाल वृद्धांत ।
प्रतिकार ज्यांत । कमी असे ।। ०२ ।।
कसला हा पेच । आम्ही सारे भक्त ।
झालो असे त्रस्त । दैनंदिनी ।। ०३ ।।
वंदन वैद्यांसी । तुझे रुप झाले ।
दोन हात केले । विषाणूंशी ।। ०४ ।।
नाही केली पर्वा । त्यांनी कुटुंबाची ।
सुश्रुषा सर्वांची । करताना ।। ०५ ।।
निसर्गाला कमी । लेखणार नाही ।
करणार नाही । चुका पुन्हा ।। ०६ ।।
कर काही आता । तूच चमत्कार ।
बरा हो आजार । सकलांचा ।। ०७ ।।
- कवी म. ना. दे.
(होरापंडित मयुरेश देशपांडे)
+९१ ८९७५३ १२०५९

0 coments