Read more
मी ही माझ्या घरीच आहे
तुम्ही ही तुमच्या घरीच रहा,
कोरोनोला हरविण्यास
प्रशासनाला साथ द्या !
जीवनासाठी पैसा आहे
पैसासाठी जीवन नव्हे
बाहेर विषाणूचा धोका आहे
जीवन धोक्यात घालू नये
मीच माझा रक्षक आहे
उगाच भटकत फिरू नये
विषाणूच्या साखळीला
स्पर्श करून वाढवू नये
आवश्यक त्या सेवां घेताना
कधीच कुठेही गर्दी करू नये,
सावधनता हाच बचाव आहे
अदृश्य शत्रूला मदत करू नये
सिनेटायझर,मास्क,हॅन्डवॉश
स्वच्छतेची साधने युध्दात विसरू नये
विजय आपला निश्चित आहे
फ़क्त आपण घर सोडू नये
कोरोनोला हद्दपार करायचे आहे
कोरोनोला हद्दपार करायचे आहे।
कवी:शांताराम वाघ.मनमाड
मो.8087493453.

0 coments