Read more
#CoronaStopkaroNa
जुन्या शर्यती संपल्या आता नवीन शर्यत आहे
इथेच थांबून जाऊ थोडे.....समोर संकट आहे
रुबाबदार हा रस्ता तरीही फसवी वळणे सारी
हरवून जातो वाटसरू अन रस्ता ना माघारी
वरवर दिसते सपाट सारे....आतून खुरडत आहे
इथेच थांबून जाऊ थोडे.....समोर संकट आहे
अवतीभवती शेवाळाचा डोह साचला आहे
ज्याला तंद्री पोहायाची..कुठे वाचला आहे
एक फितुरी,लाखो प्रेते.... जगणे धुरकट आहे
इथेच थांबून जाऊ थोडे.....समोर संकट आहे
गहिवरलेल्या हाकांना जे पायी तुडवत गेले
हे जगण्याच्या सौंदर्याशी असभ्य चाळे झाले
स्वतः स्वतःशी युद्धाचे हे काळे सावट आहे
इथेच थांबून जाऊ थोडे.....समोर संकट आहे
*--विवेक कापगते*
*भंडारा*

0 coments