धन्यवाद कविते dhayvad kavite (rajendra ugale)

धन्यवाद कविते dhayvad kavite (rajendra ugale)

Author:
Price:

Read more

      कविता खूप सन्मान देते.अनेकांना आपलंसं करते.असं मोठी माणसं नेहमी सांगतात.कविता लिहिणाऱ्या या मंदियाळीत तसा मी अजूनही खूप नवखा आहे.पण तरीही आजवरच्या दहा बारा वर्षात कवितेने मला खूप काही दिले आहे.खरंतर यासाठी मी कवितेचे आभारच मानले पाहिजे.कारण ती प्रसन्न झाली नसती तर आज जो काही सन्मान मिळतो आहे त्याला मी मुकलो असतो.
      रविवार दिनांक १३ मे हा मातृदिन सकळ समूहाच्या एग्रोवन ने माझ्यासाठी खास केला.मातृदिनाच्या निमित्ताने 'कविता भूमीपुत्रांच्या ' या सदरात कवी आणि निवड कर्ते ज्ञानेश उगले यांनी माझ्या कवितेची निवड केली आणि कविता महाराष्ट्रभर पोहचली.अनेक वाचकांनी फोन केले,काहींनी आपल्या भावनांना तर काहींनी अश्रूंना वाट मोकळी केली.खूप भरून पावलो.नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी १४ तारखेला एक सुखद धक्का बसला. पंढरपूर जवळील म्हसवद इथून फोन आला. "सर नमस्कार.मी माणदेशी रेडिओ केंद्रावरून अनुप गुरव बोलतो.एग्रोवन मध्ये तुमची माय कविता वाचली खूप आवडली. मी आपणास एक विनंती करतो की आपण आमच्या श्रोत्यांसाठी फोन इन कार्यक्रमात सहभागी होऊन कविता ऐकवाव्यात आणि कवितेबद्दल,तुमच्या लेखनाच्या प्रोसेस बद्दल,तुमच्या अनुभव व आयुष्याबद्दल बोलावं." मी भाबवलो.मला काहीच सुचेना.कोणीतरी आपली फिरकी घेतंय असं वाटलं.पण ते खरं होतं. आज १५ तारखेची सकाळची पहिली प्रसारण सभा या कार्यक्रमासाठी निश्चित झाली. ठरल्या प्रमाणे अनुपचा फोन आला आणि सुमारे एक तास हा फोन इन कार्यक्रम संपन्न झाला.खूप भरून पावलो.
      मला कवितेच्या या वाटेवर स्थिरस्थावर करणाऱ्या सर्वच मान्यवरांना मला धन्यवाद द्यावेसे वाटतात.मला शिकवणारे शिक्षक, कवितेची नकळत लय माझ्या अंगात उपजत पेरणारी माझी आई, बापाने केलेलं अभंगांचं शिंचंन... पत्नी मानिषाने दिलेली साथ आणि मुख्य म्हणजे माझ्या कविता या कविताच आहेत असं सांगणारे आणि कवितेत दुरुस्ती सुचवणारे माझे साहित्यिक गुरू ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, सहहृदयी मित्र आणि मार्गदर्शक विवेक उगलमुगले, रवींद्र मालुंजकर या सर्वांचा मी आभारी आहे.
        माणदेशी रेडिओ आणि आर.जे.अनुप गोसावी यांच्याही मी ऋणात राहू इच्छितो.धन्यवाद पुन्हा एकदा🙏🙏🙏🙏

                                                        आपलाच
                                               *राजेंद्र उगले* नाशिक
                                              मोबाईल-९९२२९९४२४३
-------------------------------------------------------------------------
                            ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

                                              संचालक - कादवा शिवार
                                              प्रतीक विजयकुमार मिठे
  •                                                  मो.9145099071
                                           #Team Kadva shivar

0 coments