Read more
फाटलेल्या जिंदगीला
टाका सुईने घालते
कळ सोसून जिव्हारी
माय आनंद दावते...
लक्तराला सांधताना
तिच्या डोळ्यात सपान
संसाराच्या धुडक्याला
लाभो जरीचं इमान...
दोन जीवाचं मिलन
त्याचा उसू नये टाका
भांडं वाजणार नाही
तुम्ही उंबऱ्याला झाका...
धागा जीवाचा करीन
सांध सांधता संसार
संस्काराच्या पदराला
नवे जोडून अस्तर...
माय उन्हात धावली
माय बापाला सावली
राब राबता राबता
तिने पापणी झाकली...
राजेंद्र उगले, नाशिक
मोबाईल- ९९२२९९४२४३
मेल- rajendraugalemani@gmail.com
------------------------------------------------------------------ ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
#Team_Kadva_shivar

0 coments