Read more
"बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना भावगंधी शुभेच्छा"
दाटली तृष्णाच या देहात बुद्धा
राहतो जो तो इथे क्रोधात बुद्धा
माणसाची पेटली स्वार्थांधता अन्
देश काही गुंतले युद्धात बुदधा
मोह, माया अन व्यभिचारीच सारे
संत हल्ली डांबले जेलात बुद्धा
पाप, पुण्ये, स्वर्ग, आत्मा, मोक्षप्राप्ती
तू अशा रमला न थोतांडात बुद्धा
वेद, पोथ्या, अन् पुराणे ठोकरूनी
पेरले विज्ञान तू धम्मात बुद्धा
कर्मकांडाच्या विरोधी बोलणारे
तत्ववेत्ते मारले देशात बुद्धा
न्याय, प्रज्ञा, शील, करुणा भीमबाने
रुजविली अमुच्या पुन्हा रक्तात बुद्धा
तू दिलेल्या तत्वज्ञानातून हल्ली
नवनवी क्रांती घडे विश्वात बुद्धा
राहुनी धम्मातही तुज टाळणारे
चाचपडती रोज अंधारात बुद्धा
गौरवकुमार आठवले,
नाशिक
मो - 9423475336
-------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
#Team Kadva shivar


0 coments