Read more
माय तुझा घाम दिसे
ङोलणाऱ्या पिकामधी
माय तुझं रुप असे
माय असे तु देखणी
तुझ्या नशिबी खुरपे
माझ्या हातात लेखणी
आली पाखरे अंगणी
त्यांची हळुवार शिळ
फळ फुलं ही डोलती
तुझ्या श्रमाचेच फळ
पाने वाजवीती टाळ्या
माय तुझ्या स्वागताला
उभ्या रानफुले कळ्या
गाळवाटाची पाऊले
किती सुरेख रांगोळी
कष्टानेच तुझ्या माय
हिर्व्या रानात दिवाळी
झुळुझुळु पाट पाणी
माय तुझं गाणं गाते
जन्मा येऊन कुशीत
आज धन्य झालो माते...
मुकुंद ताकाटे.
मोबाईल-9404569100
---------------------------------------------------------
...सावधान...
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संपादक-कादवा शिवार
#Team kadvashivar





0 coments