फोबिया phobia (rajendra ugale)

फोबिया phobia (rajendra ugale)

Author:
Price:

Read more


डोळ्यात तेल घालून जपावं म्हटलं तर 
तेल वजा झालं जगण्यातून 
आणि झोपावं म्हटलं निवांत 
तर कोणीतरी अचानकच 
बडवतय ढोल 
आणि देतय हाकाटी 
जागते रहो... 
जागते रहो...
रात्र वैऱ्याची...वगैरे .
विचारवंत म्हणवणारे 
बसलेत आमच्याच दोन्ही भुवयांवर
रस्सीखेच चा खेळ खेळत 
जोर लगा के हैश्शा... म्हणत. 
ते काढू पाहताहेत आमची बुबुळं
डोळ्यांच्या बाहेर..! 
आम्हाला दिसूच नये वास्तव जग 
याची पुरेपूर घेताहेत ते काळजी .
नाक्यानाक्यावर
आभासी विकासाचे फ्लेक्स 
झळकतायेत
आणि गरिबीची चिपडं
झोंबतयेत डोळ्यात... 
साहित्यिक वगैरे म्हणवणारे 
दंग आहेत नसलेला गुंता सोडवण्यात... 
ते डावे की उजवे ? 
घाई करा मित्रांनो जगण्याची 
नाही तर यांना उत्तर सापडण्याआधीच 
झाला असेल आम्हाला  फोबिया 
आणि आम्ही चाचपडत राहू 
अंधारी बिळात 
लोकशाही वगैरे म्हणत..! 


राजेंद्र उगले, नाशिक 
मो.9922994243
------------------------------------------------------------------       ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

                                              संचालक - कादवा शिवार
                                              प्रतीक विजयकुमार मिठे
                                              मो.9145099071
                                          #Team Kadva shivar

0 coments