Read more
जागतिक कविता दिनानिमित्त ज्या कवितेने माझ्या जीवनात माझ्या सोबत राहून आई,बहीण,पत्नी,मैत्रिण ह्या सर्व भूमिका पार पाडल्या त्या कवितेविषयी
तुझ्यासोबत चालतांना
मार्ग कधी चुकलो नाही
ठेचाळलेले पाय माझे
पुसण्या कधी वाकलो नाही
तुझी सोबत होती म्हणून
मोल माझे झाले नाही
आधारही तुझाच होता
तोल माझा गेला नाही
वादळात चालतांनाही
हात माझा सोडला नाही
खडतर मार्गातही
पाय कधी आडला नाही
काटेरी वाट होती
रक्ताळलेले पाय झाले
सोबतीला तु होतीस
कळूू नाही आले
तुझी सोबत होती म्हणून
चालतच राहीलो
चालता चालता एका नव्या
वळणावरच येऊन पोहचलो
कवी ,सोमनाथ पवार
पिंपळगाव बसवंत उसवाड
मो 8379820416
-------------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
#Team Kadva shivar

0 coments