Read more
महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा💐
,,,आई म्होणोनी,,,,,,
आई म्हणोनि कुण्या बाईला
साद फिरुनी देऊ नका
गर्भा मधल्या कळ्या खुडूनी
सुगंध त्यातील मारू नका
एक कळी उमलली थोर
झाला शिवबा तिचा पोर
पोरा पोरीचा भेद करुनि
पोरीला कचऱ्यात टाकू नका
गर्भा मधल्या,,,,,,,,,,,,,,,,।1।
साऱ्या सावित्रीच्या ज्योती
तिने कैक लविल्या वाती
उजेडाची साक्ष देणाऱ्या
वातीव फुंकर घालू नका
गर्भा मधल्या,,,,,,,,,,,,,,,,,,।२।
मर्दानी झाशीची राणी
शत्रूला पाजले पाणी
रझीयाच्याइ त्या ईतिहासाला
उगाच खोटं म्हणू एका
गर्भा मधल्या,,,,,,,,,,,,,,,,।३।
झाली आनाथांची माय
सिंधुताई एक बाय
मदर तेरेसा उभ्या जगाची
धर्मात तिला कोंडू नका
गर्भा मधल्या,,,,,,,,,,,,,,,,।४।
होता दारिद्र्याचा काळ
पंखात भरले बळ
भीमरावाला साथ देणाऱ्या
रमाचा विसर पाडू नका
गर्भा मधल्या,,,,,,,,,,,,,,।५।
आई म्हणोनि कुण्या बाईला
साद फिरुनी देऊ नका
गर्भा मधल्या कळ्या खुडूनी
सुगंध त्यातील मारू नका
कवी.सचिन गांगुर्डे
मो.9767813955
-------------------------------------------------------------------
सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची,कविची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संपादक - कादवा शिवार
#Team kadva shivar

0 coments