Read more
✍ फुलला वसंत ...
----------------------------------
बोचऱ्या थंडीत
पळस फुलला
हिरव्या रानाला
गारवा झोंबला...
सागाच्या पानांना
जाळीने धरले
सोसून गारवा
मातीला लोळले ...
बांबूच्या अंगाला
हळद लागली
सावळी नवरी
बाभूळ लाजली ...
काटेरी बोरीला
मागणी घालून
आंबाही नटला
मुंडोळी बांधून ...
चिमणी पाखरं
वऱ्हाडी नाचली
कोकिळ अष्टके
रानात घुमली ...
मोराच्या पायात
तालही नाचला
इवल्या चोचीत
बिगुल वाजला ...
वडाच्या दाढीने
झाडले अंगण
गवत सोनेरी
बसले रुसून...
चिंचेने घातला
नथीचा आकडा
चोरून पाहतो
अर्जुन सादडा...
रानाच्या कानात
पाखरं बोलली
तळ्याच्या पाण्याला
तहान लागली...
पाचोळा निघाला
वाऱ्याच्या सोबत
होळीच्या सणाला
वाजत गाजत....
शिशिर ऋतूची
सरली गंमत
कोवळ्या पानात
फुलला वसंत...
राजेंद्र उगले नाशिक
मोबाईल-9922994243
-----------------------------------------------------------
सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संपादक - कादवा शिवार

0 coments