Read more
आमच्या शेतीमातीच्या
गाणितात चुक आहे
का तुमच्याच हीशोबात
काहितरी मेख आहे...?
तूम्ही आमचे अाम्ही तुमचे
नुसती शब्दफेक आहे
शेतकर्यांशी वागणं तुमचं
कुठं साहेब नेक आहे...?
साहेब,
नाही पिकवीत आजपासून
आम्ही शेतात बाजरी-गहु
कारखान्यातल्या नटबोल्टांन
पोट कस भरत पाहू...?
साहेब,
तुमच्या पोकळ गप्पानी
गणित कस सूटेल
शेतात नाही पिकल तर
भूक कशी मिटेल...?
म्हणुन म्हणतो साहेब,
आपण अस करूनं पाहू
आमच्या हाती लेखंणी
तुमच्या हाती नांगर
एकदा तरी देउन पाहू
साहेब,
उन्हात शेत नांगरताना
घाम तूमचा गळू लागेल
चुकलेल गणित आमच
आपोआप सुटू लागेल...
__विजयकुमार मिठे__ 9881670204
-----------------------–--------------------------------------
सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संपादक - कादवा शिवार

0 coments